धारकरी - रायगड प्रदक्षिणेचा
१२ जानेवारीची सकाळ... हिरकणी ग्रुप ऑफ पनवेल आयोजीत रायगड प्रदक्षिणा मोहीमेतील आम्ही सर्व ठरल्याप्रमाणे चित् दरवाज्याखाली जमलो होतो. रायगडच्या सकाळच्या रुपाची साठवण जो तो आपल्या कॅमे-यात करत होता. खामकर बंधुनी घरुन येताना भगवा ध्वज आणला होता. कालच्या तळागड ट्रेकमधे सापडलेली काठी होतीच.. लगेच आम्ही भगवा काठीला लावला. आणि भगवा फरफरवला..!!!!