राज्याभिषेक सोहळा
उद्या जेष्ठ शुध्द त्रयोदशी !! श्री शिवराज्याभिषेकदिन !! शिवशक प्रारंभ !! महाराष्ट्राच्या नव्हे अवघ्या हिंदुस्थानच्या इतिहासातील सोन्याचा दिवस !! ब-याच जुन्या गोष्टींना एक नवीन वळण या दिवशी लागले. नवीन शक सुरु झाले. चारी बाजूला शत्रु असुनही एक सकळ मंगळ सोहळा संपन्न झाला. सर्वांनी जाणता राज्याचे सार्वभौमत्व मान्य केले होते. आजची सकाळ नवा उत्साह घेउन आली होती.