सह्याद्री
गड कोट किल्ले.. पहावे ते सह्याद्रीचे आचरणात आणु पहावे... ते कर्म थोर शिवरायांचे.... --श्रीकांत लव्हटे खरंच दु्र्ग पहावेत ते सह्याद्रीचे... रांगडे, दुर्गम तितकेच प्रेमळ, मनाला सुखावणारे...शतकोनशतके हा सह्याद्री एखाद्या आजोबांसारखा आपल्याला अंगाखांद्यावर खेळवतोय. किती पिढ्या, किती राजवटी, किती सत्तांतरे पाहीलेत याने... वर्षानुवर्षे सगळ्या घडामोडी बघत, पावसाळे उन्हाळे सोसत उभा आहे. शिलाहार, भोज, मराठे या राजवटींनी याला गडकोटांचे अलंकार लेवविले. दुर्गभंजक इंग्रजांनी ते ओरबाडले. सह्याद्री सगळी सुख दुखे घेऊन उभा आहे.