दसरा | शिलंगण

बऱ्याच ठिकाणी आपल्याला दसऱ्याला शिलंगण म्हंटलेले आढळते. साधारण शिलंगण हा सिमोल्लघंन या शब्दाचा अपभ्रंश आहे.
दसरा सण म्हणजे साधरणपणे पावसाळा संपल्याची आणि हिवाळा सुरु झाल्याची वर्दी!

[caption id="attachment_1747" align="aligncenter" width="426"]Dasara Dasara[/caption]

महाराष्ट्र परकीय आक्रमणाखाली चिरडला जात होता अश्या १७ व्या शतकात शिवरायांनी स्वराज्य उभे केले. त्या वेळी असणारा पावसाचा जोर आणि सह्याद्रीसारखी समरभूमि यामुळे पावसाळ्यात युद्ध प्रसंग कमी असायचे. लष्कराला पावसाळ्यात घरी जायची मुभा असायची. आक्रमने, नवीन मोहिमा, वेढे पावसाळ्यात बंद असायचे. एखाद्या किल्ल्याला वेढा टाकला असेलच तर त्याचे काम सुद्धा ढिसाळ व्हायचे. उदाहरण म्हणजे पन्हाळा किल्ल्याचा सिद्धि जोहर चा वेढा!
पावसाळा संपला की लष्कराने कामावर रुजू व्हावे आणि मोहिमा काढाव्यात अशी पद्धत होती. मोहिमेवर जाण्यासाठी म्हणून शस्त्रे नीट तयार केली जायची. तेल लावणे, धार काढणे इ. ने शस्त्रांची निगा करून शिलंगणाला त्यांची पूजा व्हायची. अशी पूजा करून मग लष्कर मोहिमेसाठी परमुलुखात निघायचे स्वत:च्या मुलुखाची सीमा ओलांडून! म्हणून याचे सिमोल्लघंन नाव योग्य आहे.
शिवराय दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी सिमोल्लघंन करून दसऱ्याच्या मुहूर्तावर रायगडहुन निघाले असा एक सर्वश्रुत समज आहे तर ते डिसेबंर १६७६ ला निघाले असावेत असाही एक तर्क आहे.
माझे शिवकाळाचे वाचन असल्याने त्या काळाच्या अनुषंघाने ' शिलंगण'चा अर्थशोध-लेख लिहिला आहे. बहुत काय लिहीणे.
शिलंगणाच्या आपणा सर्वाना खुप शुभेच्छा! आपल्याला येणाऱ्या सर्व अडचणींचे सिमोल्लघंन करून यशाकडे आपण भरारी घ्याल हीच सदिच्छा !!

©श्रीकांत लव्हटे
www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास ????

Comments

Popular posts from this blog

जावळीच्या मोरेंची बखर : सारांशलेखन

साष्ठीची बखर : सारांशलेखन